नाशिकमध्ये आसाराम बापूचा आश्रम जमीनदोस्त

Updated: May 21, 2018, 08:50 PM IST

नाशिक : धडाकेबाज मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. आता तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

गोदावरी नदीच्या निळ्या रेषेतील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे काम सुरु झालेय. यात आसाराम बापू याचा आश्रम जमीनदोस्त करण्यात आला आहे.