नाशिक : एकीकडे राजकीय वातावरण तापलेले असतांना मात्र नाशिक शहरात पहिल्यांदाच तापमान 15 वर्षाच्या खाली गेले आहे. 24 तासात 13.8 किमान तापमानाची नोंद हवामान खात्याच्या केंद्रामध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात 15.7 पर्यंत किमान तापमान होते . या आठवड्यात हे दोन अंशाने उतरल्याने शहरात आणि ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला आहे.
यंदा परतोच्या पावसामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा नाशिककरांना तितकासा जाणवला नाही. मात्र थंडीची चाहूल लागल्याने आता बाजारामध्ये उबदार कपड्यांची मागणी वाढू लागली आहे. इगतपुरी निफाड भागांमध्ये सकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत धुक्याचा अंमल दिसून येत असल्याने महामार्गावर दृश्यमानता कमी झाली आहे.
जॉगिंग ट्रॅकवर व्यायाम करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. एकूणच या थंडीमुळे कधीकाळी गुलशनाबाद असलेल्या या नाशिकचे वातवारण या हंगामात पहिल्यांदाच गुलाबी गुलाबी झाले आहे.