Latest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी

Virar News: हेल्मेट न घातल्यामुळे चालू वर्ष 83 दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Nov 24, 2022, 05:32 PM IST
Latest Update : 'या' शहरात Bike चालकांसाठी महत्त्वाची बातमी  title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक: नाशिक शहरात 1 डिसेंबर पासून पुन्हा हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट (Helmet News) न घातल्यास मोटर वाहन कायदानूसार कारवाई यासोबतच पाचशे रुपये दंडाची शक्यता आहे. शहरातील अपघातात चालू वर्षी हेल्मेट (Virar News) न वापरल्यामुळे 83 मोटार सायकलस्वारांचा (Bikers) मृत्यू झाला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये 261 दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यामुळे येत्या 1 डिसेंबर 2022 पासून सर्व नाशिककरांना वाहने चालवितांना हेल्मेट आवश्यक असेल. जे चालक हेल्मेट घालणार नाहीत, त्यांच्यावर मोटार वाहन कायदा अधिनियम 1988 कलम 129/177 अन्वये कारवाई करुन ती अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या काळात बदलीनंतर मोहीम शिथिल झाली होती. (nashik news bikers now have complusory carry helment while driving bike in nashik)

विशेष म्हणजे तत्कालिन पाेलिस आयुक्त (Police) दीपक पांडेय यांनी मागीलवर्षी शहरात हेल्मेट सक्ती केली हाेती. या निर्णयाला बराच विराेध झाला हाेता. मात्र चालकांनी हेल्मेटची सवय लावून घेतल्याने बऱ्यांच अंशी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले हाेते. त्यानंतर पांडेय यांची बदली झाल्याने हेल्मेट सक्ती नावापुरतीच राहिली हाेती. आता मात्र सध्याचे पाेलिस आयुक्त नाईकनवरे यांनी चालकांना हेल्नेट वापरावेच, असे आवाहन करत परिपत्रक काढले आहे. अपघातांच्या कारणांचे विश्लेषण केले असता त्याच बरेच दुचाकीस्वार अपघात झाल्यानंतर रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले किंवा रस्त्यावर डोके आपटून मृत्यू पावले आहेत. दुचाकी वाहन चालवित असतांना हेल्मेटचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 129/177 नुसार बंधनकारक आहे. 

हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

हेल्मेट नाही घातलं तर पडेल महागात : 

हेल्मेट न वापरता दुचाकी वाहन चालविल्यास रु 500/- दंडाची तरतूद आहे. कायदेशीर बाबी परंतु हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. हेल्मेट वापरतानाही दुर्देवाने अपघात झालाच तर डोक्याला व चेह-याला गंभीर इजा होत नाही. तसेच जिवितहानी (Helmet News in Virar) देखील होत नाही हे निष्पन्न झाले आहे. या केल्या हाेत्या उपाययाेजना शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग 3 वर गस्त वाढविली असता प्राणांतिक अपघातांमध्ये ब-यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. वाढविलेल्या गस्तीमुळे काही वाहन चालकांचा जीव वाचलेला आहे. कोणाचा जीव वाचला हे अर्थातच समजून आलेले नाही. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहे व त्या त्या वेळी अपघाताच्या संख्येमध्ये प्राणांतिक अपघातामध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आलेले आहे.

हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

गेल्या सहा-सात महिन्यांपासून नाशिककरांच्या स्वभावाबद्दल... - जयंत नाईकनवरे, पाेलिस आयुक्त, नाशिक 

गेल्या सहा-सात महिन्यांपासून नाशिककरांच्या (Nashik News) स्वभावाबद्दल माझे असे निरीक्षण आहे की हे शहर कायदा व सुव्यवस्थेचे स्वंयस्फूर्तीने पालन करते. त्यामुळे सुजान नागरिकांना सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. तथापि दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर जखमा व त्यामुळे येणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणा-यांविरुध्द पोलीसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते. सर्व दुचाकीस्वारांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरुन वाहतूक नियमांचे पालन करावे.