क्रीडाविश्वात शोककळा; बॉक्सिंग खेळाडू तरुणीचा अपघातात मृत्यू

या प्रकरणी पोलिस (Police) अधिक तपास करीत आहेत. 

Updated: Nov 24, 2022, 04:03 PM IST
क्रीडाविश्वात शोककळा; बॉक्सिंग खेळाडू तरुणीचा अपघातात मृत्यू title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे: बॉक्सिंगमध्ये (Boxing) तरबेज असलेल्या धुळे शहरातील बॉक्सिंग पटू (Boxer) अंजली कवळे या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू (accident) झाला आहे. अंजली ही अतिशय उत्कृष्ट बॉक्सर होती. एका क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिरपूर कडे जात असताना त्यांच्या मोटरसायकलला (Bike) भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. या अपघातात अंजली गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तीचा मन हेलावणारा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अंजलीच्या मृत्यूमुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त (Sad News) केली जात आहे. अंजली मनमिळावू आणि पुरुषी प्राबल्य असलेल्या बॉक्सिंगच्या क्षेत्रातील नाव कमावण्यासाठी मोठ्या जिकरीचे मेहनत करत होते. मात्र सुसाट वाहनाच्या धडकेने तिचा जीव घेतला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास (Police) करीत आहेत. (boxing player anjali kavale dies in road accident) 

कसा घडला नेमका प्रकार: 

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणापासून जवळ असलेल्या गोराणे फाटा जवळ भरधाव वेगातील कारने (Car) मोटारसायकलला धडक दिली. दाेघे खेळाडू जखमी झाले. त्यापैकी महिला बॉक्सिंगपटू अंजली कवळे हिचा उपचार घेताना दुर्दैवाने मृत्यू झाला. शहरातील गवळे नगरातील रहिवाशी असलेली अंजली नारायण कवळे (वय 18) ही तरुणी बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठी (Boxing Competitions) शिरपुर ला निघाली होती. तिच्यासोबत अन्य एक खेळाडू देखील होती. गोराणे फाटाजवळ त्यांना भरधाव वेगातील कारने धडक दिली. यात दोघे जखमी झाले. या दोघांवर देवपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान अंजली हिचा मृ़त्यू झाला. या प्रकरणी देवपुर पोलिस ठाण्यात शुन्य क्रमांकाने नोंद करण्यात आली आहे. तर घटनेची कागदपत्रे नरडाणा पोलिसांना पाठविण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - छप्पर फाडके! मालवणमध्ये मच्छिमारांना रापणीला लागली 'बंपर मासळी'

कोण होती अंजली? 

मृत अंजलीच्या पश्चात आई वडील, भाऊ व बहिण असा परिवार (Family) आहे. अंजली ही पुरुष वर्चस्व असलेल्या बॉक्सिंग मध्ये नाव कमवू इच्छित होती. धुळे शहरातील गरुड मैदानामध्ये ती नित्यनियमाने सरावासाठी येत होती आणि शिरपूर येथे आपलं कौशल्य दाखवण्याच्या उद्देशाने स्पर्धेतसाठी निघाली होती. मात्र तिचं देशात बॉक्सिंगपटू म्हणून नाव कमावण्याच स्वप्न अधुर राहिलं आहे. एका वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या गाडीला धडक दिली आणि त्यात तिने या जगाचा निरोप घेतला. तिच बॉक्सिंग पटू (How to become boxer player) होण्याचं स्वप्न हे अधुर राहिल. अत्यंत हलकीच्या परिस्थितीत जगत असताना अंजली मोठ्या कष्टाने बॉक्सिंगचा सराव करत होती. तिचे वडील खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. अत्यंत तोडक उत्पन्न असतानाही त्यांनी आपल्या मुलीला बॉक्सिंग पटू बनवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या या निर्णयाला अंजलीचीही तेवढीच तोलामोलाची साथ होते. मात्र वेगाने तिचा घात केला, अपघातात तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधीक तपास करीत आहेत. धडक देणाऱ्या कारची (car news) चौकशी सुरू आहे. महामार्गावरती होणारे अपघात किती स्वप्न भंग करतात? हे पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाल आहे.