'त्या' प्रियकराचा मृत्यू, 'व्हॅलेंटाईन डे' ठरला अखेरचा दिवस

सारं काही कशासाठी... तर प्रेमासाठी... एकमेकांवर अतोनात प्रेम केलं पण त्या प्रेमाचा अंत अंगावर काटा आणणारा 

Updated: Feb 14, 2022, 09:16 AM IST
'त्या' प्रियकराचा मृत्यू, 'व्हॅलेंटाईन डे' ठरला अखेरचा दिवस  title=

मुंबई : एकेकाळी एकमेकांवर अतोनात प्रेम केलं. पण प्रेमात आलेला दुरावा इतका विकोपाचा ठरला की एकमेकांच्या जीवावर उटले. तीन वर्षे एकमेकांचं मन जपलं. पण प्रेमाचं रुपांतर लग्नात होऊ शकलं नाही म्हणून प्रियकराने प्रियसीला मनस्ताप द्यायला सुरूवात केली. आणि इथूनच त्यांच्या प्रेमात कटूता आली... या संपूर्ण प्रकाराचा शेवट अंगावर काटा आणणारा आहे. 

नाशिकच्या देवळ्यात प्रेयसीनं जाळलेल्या प्रियकराचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच मृत्यू झाला आहे. सारं काही कशासाठी तर प्रेमासाठी... लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीनं कुटुंबियांच्या मदतीने टोकाचा पाऊल उचललं. 

नेमकी घटना काय?

देवळा तालुक्यातल्या लोहणेर गावात राहणाऱ्या गोरख बच्छाव या तरुणाचं मालेगावजवळच्या रावळगाव इथं राहणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघंही एकाच समाजतले आणि जवळचे नातेवाईक होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते, आणि त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता.

पण मुलीच्या कुटुंबियांच्या कानावर ही गोष्ट गेली, त्यांनी या लग्नाला विरोध केला आणि मुलीचं दुसरीकडे लग्न ठरवलं. या गोष्टीने दुखावलेल्या गोरख बच्छावने मुलीच्या होणाऱ्या नवऱ्या मुलाला प्रेमसंबंधांची माहिती दिली. आपले आणि मुलीचे प्रेमसंबंध असून तिच्याशी लग्न करायचं असल्याचं त्याने सांगितले. यानंतर होणाऱ्या नवऱ्या मुलाने लग्न मोडलं.

मुलीचं लग्न मोडल्याने तिच्या घरचे चांगलेच संतापले. त्यांनी मुलाचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक म्हणजे ती मुलगीही घरच्यांचा कटात सामील झाली. बदला घेण्याच्या भावनेने मुलगी आणि तिचं कुटुंब पेटून उठलं. 

त्यांनी गोरख बच्छावला संपवण्याचा कट रचला. मुलीने फोन करुन गोरखला लोहणरे गावातील एका मंदिराजवळ भेटायला बोलावलं. मुलगी आणि तिच्या घरचेही त्या ठिकाणी पोहचले. पण पोहचण्याआधी मुलीने दुकानातू रॉकेल विकत घेतलं. 

बोलवल्या प्रमाणे गोरख बच्छाव मंदिराजवळ आला असता मुलगी तिचे आई, वडील आणि दोन भावांनी मुलीचं लग्न का मोडलं असा जाब विचारत त्याच्यावर वार केले. त्याचवेळी संतापलेल्या मुलीने गोरखवर रॉकेल टाकलं आणि त्याला पेटवून दिलं. यात गोरख ५५ टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर नाशिकमधल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.