नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीला ५२ लाखांची मदत

 नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान साहयता निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला.  

Updated: May 2, 2020, 01:27 PM IST
नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पंतप्रधान निधीला ५२ लाखांची मदत title=
कोविड-१९ प्रतिबंधासाठी बावन्न लाख रुपयांचा धनादेश रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडे सुपुर्द

मुंबई : कोरोना प्रतिबंधासाठी अनेकजण आपापल्या परीने शासनाला मदत करत आहेत. नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानने पंतप्रधान साहयता निधीला ५२ लाख रुपयांचा निधी गुरुवारी दिला. रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. संस्थानतर्फे उपकार्यकारी अधिकारी राजन बोडेकर यांनी हा धनादेश दिला. 

आता देशात तसेच राज्यात कोरोनाचे सावट मोठे आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्मयंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही मदत केल्याचे नरेंद्र महाराज संस्थानच्यावतीने सांगण्यात आले. संस्थानने यापूर्वी १ एप्रिलला मुख्यमंत्री निधीला ५० लाखांचा निधी दिला आहे. त्यामुळे संस्थानने एकूण १ कोटी २ लाखांचा निधी राज्य आणि केंद्र सरकारला देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

जगद्गुरु नरेंद्रचार्य संस्थानने कोरोनाविरोधात लढ्यासाठी पुढाकार घेत आणि सामाजिक  बांधिलकी जपत कोविड-१९ साठी ही एक कोटी दोन लाखांची मदत केली आहे. याआधी नरेंद्र महाराज संस्थानतर्फे नैसर्गिक आपत्तीसाठीही मदत केली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी, भूंकप पीडित लोकांसाठी मदत केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात आलेल्या पुरात अनेकांचे संसार उद्धवस्त  झालेत. तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी संस्थानने ११०० टन चाऱ्याचे वाटप केले. तसेच शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.