कोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद

 कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे.  

Updated: May 2, 2020, 01:13 PM IST
कोरोना संकट । औरंगाबादेत कडक संचारबंदी, शहर विषम तारखेला बंद  title=
संग्रहित छाया

औरंगाबाद : कोरोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे २३ नवे रुग्ण सापडले आहे. औरंगाबादचा एकूण आकडा २३९ वर गेला आहे. लॉकडाऊनही आता कडक पाळण्यात येणार आहे. आजपासून विषम तारखेला शहर राहणार पूर्ण बंद आहे. तर सम तारखेला सकाळी ७ ते ११ दरम्यानच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने असणार सुरु राहणार आहे, तसे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 

औरंगाबादेत काल १ मेपासून तीन दिवस कडक संचारबंदी करण्यात आली आहे, सर्वच दुकान आता तीन दिवस बंद राहणार आहेत. औषधांची दुकान सुद्धा दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. दरम्यान उद्यापासून औरंगाबाद शहर विषम तारखेला पूर्ण बंद राहील तर सम तारखेला सकाळी ७ ते ११ या वेळेतच जीवनावश्यक दुकाने सुरू राहतील. १७ मेपर्यंत याची अंमलबजावणी असेल, अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.  

दरम्यान, शुक्रवारी औरंगाबादेत ३२ नवे रुग्ण आढळले आहेत त्यामुळे रुग्णांची संख्या थेट २०९ वर पोहोचली होती. यात औरंगाबादच्या हॉट स्पॉट असलेल्या मुकुंदवाडी भगत मोठ्या संख्येने रुग्ण वाढले होते. काल दिवसभरात २९२ सांशीयतांचे टेस्ट करण्यात आले. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.  औरंगाबादेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे तर २७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. 

तसेच गुरुवारी औरंगाबादेत गेल्या २४ तासात कोरोनाचे ४७  रुग्ण आढळले होते. कोरोनाची हॉट स्पॉट असलेल्या, नूर कॉलनी,  भीम नगर, किले अर्क या भागातील संख्या वाढत आहे.  तर मुकुंदवाडी भागातील संजय नगर चे सुद्धा नव्याने १८ रुग्ण आढळले होते. त्यामुळे हे सगळे भाग सील केले आहेत.