नांदेडमध्ये महापालिका निवडणूक: काँग्रेसनं फोडला प्रचाराचा नारळ

नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ काँग्रेसनं फोडला आहे. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली.

Updated: Sep 27, 2017, 09:31 AM IST
नांदेडमध्ये महापालिका निवडणूक: काँग्रेसनं फोडला प्रचाराचा नारळ title=

नांदेड : नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ काँग्रेसनं फोडला आहे. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली.

नांदेडात कमळचा नारा देणा-या भाजपाचं कलम कापून काढा अशी साद चव्हाणांनी मतदारांना घातली. तर सत्तेत राहून महागाईवर आंदोलन करणा-या शिवसेनेवरही चव्हाणांनी टीका केली आहे.