नागपूर : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज सकाळी छापेमारी सुरू केली होती. त्यानंतर त्यांना ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांचे भाऊ प्रदीप उके यांनाही ताब्यात घेतले. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. (ED raid on lawyer Satish Uke house)
सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते. नागपुरातील त्यांच्या घरावर ईडीचा छापाने टाकला होता. जो व्यक्ती मोदी यांच्या सरकार विरोधात भूमिका मांडेल त्यावर केंद्रीय यंत्रणा गैरवापर करत कारवाई करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. वकील उके यांच्यावर केलेल्या ईडी कारवाईनंतर पटोले यांनी टीका केली आहे.
प्रसिद्ध वकील सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. अॅड. सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. pic.twitter.com/8aMtA0Cmef
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 31, 2022
सतीश ऊके यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू असताना त्यांना भेटायला वकील सहकारी वैभव जगताप आणि त्यांचे सहकारी गेले होते. उके यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप त्यांच्या वकील सहकाऱ्यांनी केला आहे.