नागपूर : ED raid on lawyer Satish Ukey house : प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. अॅड. सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. सतीश उके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवडणूक याचिकेत बाजू मांडली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखले जाते. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तीवाद केला आहे.
वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. ईडीचे अधिकारी पहाटेपासूनच उके यांच्या घराची झाडाझडती करत आहे. त्यांच्या घराखाली सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक याचिका केली होती. यावरुन सतीश उके चर्चेत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकरणातही उके हे फडणवीसांविरोधात बाजू मांडत होते. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. वकील सतीश उके यांचे राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणात नाव चर्चेदरम्यान घेतले जाते. यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधातही भूमिका घेतली होती. दोन्ही नेते नागपूरचेच आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने केस लढवली होती.