नागपूर : नागपूरमधील एका इमारतीला आगर लागली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला ही आग लागली आहे. धुराचे लोट मोठ्या प्रमाणात इथे दिसत आहे. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. बाहेरच्या बाजूने आग विझल्याची दिसत असली तरी आतल्या बाजून आग आहे का याचा तपास अग्निशमन दलाचे जवान करत आहे. यामध्ये काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या इमारतीत काही मजूर काम करत होते. पण त्यांना खाली आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.आगीचे कारण अद्याप कळाले नसून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
या इमारतीच्या खालच्या बाजूस संचिती रुग्णालय आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. इमारतीच्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावर कामगार होते. आगीच्या घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान पोहोचले आहेत. या ठिकाणी खूप सारे कार्यालय आहेत. गाड्यांची पार्किंगने गेट आणि महत्त्वाच्या जागा अडली होती. नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळून या गाड्या बाहेर काढल्या. अवैध ठिकाणच्या पार्किंगमुळे आगी पर्यंत पोहोचणे अग्निशमन दलाच्या जवानांना शक्य नसते. हे मुंबईतील आगीच्या अनेक घटनांमधून समोर आले होते. दुर्देवाने या ठिकाणीही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.