नागपूर -महामेट्रो नागपुरच्या विकासात, सौदर्यांत सातत्यानं भर टाकत आहे.मेट्रोचं आर्किटेक लक्षवेधी ठरत आहे.वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुल, आनंद टॉकीज येथे निर्माण केलेले बॅलन्स कॅटीलीव्हर, सिताबर्डी येथे गर्दीच्या ठिकाणी उभारललेले इंटरचेंज मेट्रो स्टेशन असो वा झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन, यांसह अनेक ठिकाणी आधुनिक असे निर्माण कार्य करत शहराला एक नवी ओळख मेट्रोनं दिली आहे.यामध्ये आणखी भर पडणार आहे.
कामठी मार्गावर गड्डीगोदाम, गुरुद्वारा या ठिकाणी फोर लेअर वाहतूक व्यवस्थेचा चार मजली उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. त्यासाठीचं विशालकाय लोखंडी स्ट्रकचर तयार करण्यात आलं आहे.लवकरच ते गड्डीगोदाम या ठिकाणी सदर लोखंडी स्ट्रकचर बसविण्याचे कार्य सुरु होणार आहे. मुख्य म्हणचे सदर लोखंडी स्ट्रकचर बुटीबोरी एमआयडीसी या ठिकाणी तयार करण्यात आले असून आता सडक मार्गाने बुटीबोरी येथून गड्डीगोदाम या ठिकाणी ट्रेलरच्या साहाय्याने आणल्या जात आहे.
फोर लेअर वाहतूक व्यवस्थेसाठीचं हे लोखंडी स्ट्रकचर प्रथमतः बुटीबोरी येथे उभारण्यात आले आहे. या ठिकाणचे कार्य पूर्ण झाल्यानंतर या स्ट्रकचरला डिसमेंटल करून रस्त्याने गड्डीगोदाम येथे आणल्या जात आहे. लोखंडी स्ट्रकचर बुटीबोरी येथे उभारतांना 250 टन क्षमतेच्या 2 क्रेनचा उपयोग करण्यात आला गड्डीगोदाम येथे उभारणी करतांना 500 टन क्षमतेच्या 2 क्रेनचा उपयोग करण्यात येतोय.
देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चार स्तरीय बांधकाम केल्या जात आहे. हे निर्माण कार्य अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्त अश्या रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे .
-- स्ट्रकचरची जमिनीपासून उंची 24 मीटर,लांबी 80 मीटर व रुंदी 18 मीटर आहे.
- एकूण वजन 1 हजार 634 टन
- 154 कर्मचाऱ्यानी पुलाचे प्रत्येक सुटे भाग तयार केल
-स्ट्रक्चर उभारणी करतांना सुमारे 7800 एएसएफजी (हाईट स्ट्रेंथ फ्रिक्शन ग्रीप) बोल्टचा उपयोग करण्यात आला.
हा डबल डेकर उड्डाणपुल एलआयसी चौक येथून सुरु होणार असून आटोमोटीव्ह चौक पर्यत कामठी रोडपर्यंत असणार आहे.त्याची सर्वात जास्त उंची गड्डी गोदाम येथील गुरुद्वारा जवळ आहे.