नागपूर : सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या

Nagpur Crime News : सिगरेट ओढताना रोखल्याने तरुणींनी आपल्या मित्राला बोलावून युवकाचा खून केल्याचा धक्कादाखक प्रकार नागरपुरात घडला आहे. या हत्याकांडात दोन तरुणींसह तिघांना अटक करण्यात आली.

आकाश नेटके | Updated: Apr 8, 2024, 10:51 AM IST
नागपूर : सिगरेट ओढताना व्हिडीओ काढल्याने संतापली तरुणी; मित्राच्या मदतीने केली तरुणाची हत्या title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा हत्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळतं आहे. नागपुरात क्षुल्लक कारणावरुन एका तरुणीने मित्रांच्या मदतीने एका तरुणाची हत्या केली आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह तीन आरोपींना अटक केली आहे.

नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत महालक्ष्मी नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. सिगारेट ओढताना व्हिडिओ का घेतला या वादतून तरुणीने पुरुष सहकाऱ्यांना बोलावून एका तरुणाची हत्या केली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. रणजित राठोड (28 वर्ष) असं मृत तरुणाचे नाव आहे. तर जयश्री पानझरे (30) सविता सायरे  (24) आणि आकाश राऊत  (26) वर्ष अशी तीन आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

मृत रणजितचे कपड्याचे दुकान आहे. दुकानाच्या परिसरातील पान टपरीजवळ उभे राहून सिगारेट ओढणाऱ्या जयश्रीचा रणजितने व्हिडिओ घेतला होता. तसेच तो तिच्याकडे एकटक पाहत असल्याचा आरोपही जयश्रीने केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यावेळी जयश्री आणि सविताने रणजितला शिवीगाळ केली होती. त्यानंतर जयश्रीने तिच्या आणखी पुरुष मित्रांना फोन करून बोलावलून घेतले. दोघींनी मित्र आकाशच्या मदतीने रणजितवर धारधार शस्त्र आणि दगडांनी हल्ला केला. या हल्ल्या रणजित हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रणजितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणींसह तीन आरोपींना अटक केली आहे.

जयश्रीने आकाश राऊत याला फोन करुन बोलावण्यानंतर तिघांनीही रणजितला जबर मारहाण केली होता. त्यांनी रणजितला खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन माफी मागण्यास भाग पाडले. मात्र त्याने माफी मागण्यास नकार दिल्यामुळे जयश्री आणि सविता यांनी रणजितचे हात पकडले आणि आकाशने चाकूने सपासपा वार करून त्याचा खून केला.