Nagpur Crime News : नागपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका जोडप्याने लग्नाच्या ड्रेसमध्येच आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी दोघांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जोडप्याने आत्महत्येचे कारण सांगितले आहे. तसेच कुटुंबियांना शेवटचा मेसेज देखील दिला आहे. या घटनेमुळे सोशल मिडियावर एकच खळबळ उडाली आहे.
नागपूर शहरातील मार्टिन नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पती- पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जेरील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जेरील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला.
6 जानेवारी रोजी रील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. सेलिब्रेशननंतर जेरील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप यांनी लग्नाच्या कपड्यात आत्महत्या केली आहे.
घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली आहे. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी जेरील मनक्रीप आणि डेंनी जेरील मनक्रीप यांनी व्हिडीओ स्टेटसला व्हिडिओ लावला होता.
जेरील मनक्रीप हे काही वर्षांपूर्वी शेफचं काम करत होते तर त्यांची पत्नी घरकाम करायची. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवले आहेत.
सुसाईड नोटसह पोलिसांना स्टॅम्प पेपर आणि घरात 75 हजार रुपये सापडले आहे. अंत्यविधीसाठी हे 75 हजार रुपये घरात ठेवल्याचे या दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. आपले राहते घर कुणाला द्यावे याची सुद्धा नोंद त्यांनी स्टॅम्प पेपर वर केली आहे.
मुलं होत नसल्यामुळे नैराश्यातून दाम्पत्याने जीवनयात्रा संपविल्याचे कारण समोर आले आहे. बराच काळ पती बेरोजगार होता. दाम्पत्यावर कर्ज झाले होते. आता गुजराण कशी करायची ही विवंचना होती. आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला आणि त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.