निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले, देवेंद्र फडणवीस खटल्याचा युक्तीवाद पूर्ण

 देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे.  

Updated: Dec 4, 2019, 05:14 PM IST
निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले, देवेंद्र फडणवीस खटल्याचा युक्तीवाद पूर्ण title=

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रकात गुन्हे लपवल्याप्ररकरणी फडणवीस यांच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र, पुढील तारखेला देवेंद्र फडणवीस यांना स्वत: हजर राहावे लागणार आहे. तसे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील याचिकेवरील पुढील सुनावणी चार जानेवारीला होणार आहे. नागपूरच्या न्यायालयाने फडणवीस यांच्या अनुपस्थित राहण्याला मान्यता दिली. मात्र, ही सूट फक्त आजपुरती असल्याने पुढील तारखेला म्हणजेच ४ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांना स्वत: हजर राहावे लागणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

फडणवीस यांच्या वकिलांनी चार आठवड्यांचा कालावधी मागितला होता, तर याचिकाकर्ता सतीश उके यांनी दोन आठवड्यांचा कालावधी द्या, अशी मागणी केली होती. निवडणुकीच्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तीन गुन्हे लपवल्याप्रकऱणी याचिका दाखल करण्यात आली आहे.