जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशकातून विरोध

जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशिक जिल्ह्यातून विरोध होतोय.

Updated: Oct 29, 2018, 06:43 PM IST
जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशकातून विरोध  title=

नाशिक : पाण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला काही दिवस थांबवं लागणार आहे. जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर-नाशिक जिल्ह्यातून विरोध होतोय. तरीही पाटबंधारे विभागानं प्रवरा नदीतून पाणी सोडण्यासाठी तयारी म्हणून निळवंडे धरणात भंडारदरा धरणातून पाणी सोडून निळवंडे धरणाचा पाणीसाठा हा सव्वा आठ टीएमसी करुन ठेवलाय.

मंगळवारी पुन्हा बैठक

प्रवरा नदीपात्रात सध्या सिंचनासाठी कोटेशन सुरु असल्यानं नदीपात्रात पाणी वाहतंय. त्यात जायकवाडीसाठी १० हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची तयारी पाटबंधारे खात करतंय. मंगळवारी पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एक बैठक आयोजित करण्यात नियोजन केलं जातंय.  त्यामुळे पाणी सोडण्यास गुरुवार उजेडतो की काय असं दिसतंय.

मराठवाड्यातले आमदार आग्रही 

एकीकडे जायकवाडीला पाणी सोडण्याचा मुहूर्त लांबत असताना मराठवाड्यातले आमदार मात्र पाण्यासाठी आग्रही असल्याचं दिसतंय. 

नगर आणि नाशिकच्या धऱणांमधून मराठवाड्यासाठी येणारं पाणी हे हक्काचं असल्याचा दावा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधीकड़ून केला जातोय.

समन्यायी पाणी वाटप कायदा आणि मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसारच वरच्या धऱणांच्या तुलनेत जायकवाडी धऱणात 170 दलघमी पाण्याची तुट आहे. त्यामुळंच ते पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी पाटबंधारे विभागानं घेतलाय.

हक्काचे पाणी देण्यास अडचण कुठली असा सवाल मराठवाड्यातून केला जातो.

मराठवाड्यातही दुष्काळ परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे, त्यात जायकवाडी मध्ये पाणी सोडल्यास काहीअंशी तरी दिलासा मिळेल मग विरोध कशाला असा लोकप्रतिनिधींच म्हणणं आहे.