पोलिसांच्या बॅरिकेड्सला धडकून बाईकचा अपघात

मुंबईतील भोईवाडा परिसरात बाईकचा भीषण अपघात झाला आहे. 

Updated: Apr 7, 2018, 09:11 PM IST

मुंबई : मुंबईतील भोईवाडा परिसरात बाईकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बाईकस्वार गंभीर जखमी झाला असून, उपचाराकरीता त्याला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलंय. गुरुवारी भोईवाडा परिसरात पोलीस बंदोबस्त सुरू होता. यावेळी वाहतूक पोलिसांनकडून रस्त्यावर बॅरिगेट्स लावण्यात आले होते. मात्र बाईकस्वाराला बॅरिगेट्सचा अंदाज नआल्यामुळे तो बॅरिगेट्सवर जाऊन धडकला. हि संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.