खंडाळ्यात एक्सप्रेसवर दरड कोसळून तीन जण जखमी...

पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर  दरड कोसळल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यात तीन प्रवासी जखमी झाले असून कर्जतमधील रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 21, 2017, 12:07 PM IST
खंडाळ्यात एक्सप्रेसवर दरड कोसळून तीन जण जखमी...  title=

मुंबई : पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर  दरड कोसळल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यात तीन प्रवासी जखमी झाले असून कर्जतमधील रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

शिवप्रसाद मल्लाप्पा हिरेमठ (वय २७, रा. साई वैष्णवी जीएम रोड भांडुप पश्चिम), हुसैनसाब बेलोकी (वय ५९), मोहम्मद असिफ (वय २५ हळदी, हुबळी), अशी या जखमींची नावे आहेत. प्राथमिक उपचारानंतर या तिघांनाही कल्याण रेल्वे स्टेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणावळ्यातील खंडाळा घाटाजवळील रेल्वे प्रवास धोकादायक होऊ लागला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली हुबळी एक्स्प्रेस पहाटे साडे पाचच्या सुमारास खंडाळा घाटात पोहोचली. मंकी हिल पॉईंट येथून जात असताना एक्स्प्रेसवर दरड कोसळली. या घटनेत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. 

मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर मंकी हिलजवळ दरड कोसळल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.