ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, आणखी एक मेट्रो सेवेत येणार, असा असेल प्रकल्प

Thane Metro 4: ठाणेकरांचा वाहतुककोंडीतून सुटका होणार आहे. मेट्रो 4 चा आव्हानात्मक टप्पा पार पडला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 18, 2024, 12:04 PM IST
ठाणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार, आणखी एक मेट्रो सेवेत येणार, असा असेल प्रकल्प title=
mumbai news update Completion of Wadala-Kasarvadavali Mumbai Metro 4 Project

Thane Metro 4: लवकरच मुंबईकरांना आणखी एक मेट्रो मिळणार आहे. वडाळा ते कासारवडली मेट्रो 4 मार्गिकेवरील एक अवघड टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर चार यू गर्डरची उभारणी करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आलं आहे. यामुळं मेट्रो 4 आणि मेट्रो 5 मार्गिकेवरील स्थानकांचे इंटीग्रेशन सहज शक्य होणार आहे. तसंच, मुंबईकरांना प्रवासाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. 

मेट्रो 4च्या पॅकेज 12 मधील कापूरबावडी मेट्रो स्थानक हे मेट्रो 4 आणि 5 या दोन मेट्रो मार्गिकांचे इंटीग्रेटेड स्थानक आहे. दोन्ही मेट्रो स्थानके एकाच जागी असल्याने त्यांच्या बांधकामाचे काम अधिक आव्हानात्मक होते. शनिवारी या स्थानकाच्या भागात चार गर्डरची उभारणी करण्यात आली. कंपनीने 500 ते 550 टन क्षमतेच्या दोन अवजड क्रेन्स, गर्डर वाहून नेण्यासाठी 4 मल्टीअॅक्सल पुलर, काउंटर वजन वाहून नेण्यासाठी 6 ट्रेलर, 5 मॅन लिफ्टर्स, 4 हायड्रा, 2 रुग्णवाहिका नियुक्त केल्या होत्या. रात्री 11 ते सकाळी 7 यावेळेत हे काम पूर्ण करण्यात आले. 

कसा असेल हा मेट्रो मार्ग

वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार या मार्गिकेमुळं ठाणेकरांची वाहतुककोंडीतून सुटका होणार आहे. 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसंच,  पहिल्या टप्प्यात घोडबंदर ते मुलुंड दरम्यान मेट्रो धावणार आहे. मेट्रो (Metro) लाइन 4 म्हणजे वडाळा ते कासारवडवली आणि मेट्रो लाइन 4 अ मध्ये कासारवडवली ते गायमुख अशा मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने या मेट्रो प्रकल्पावर 2006 पासून काम करण्यास सुरुवात झाली आहे. 

या दोन्ही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यानंतर 2031पर्यंत दोन्ही मार्गिकांवर एकाचवेळी 15 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. मुंबई मेट्रो महाराष्ट्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर नागरिकांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. तसंच, कनेक्टिव्हीटीदेखील मिळणार आहे.