मुंबई : MP Development Fund : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. 'झी 24 तास'च्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज्यातील 10 खासदार निधी खर्च करण्यात नापास झाले आहेत. विकासनिधीचा खर्च काही खासदारांनी वापरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे.तर काहींनी फक्त थोडा थोडकाच निधी वापरला आहे. बीडच्या प्रीतम मुंडेंनी दमडीही खर्च केलेला नाही. तर जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे खर्चात मात्र, सर्वात आघाडीवर आहेत.
खासदारांना प्रत्येक वर्षात मिळतो 5 कोटींचा निधी मिळतो.पण, काही खासदारांनी निधी खर्च करण्याची तसदीही घेतलेली नाही. मंजूर झालेला निधी रस्ते, सार्वजनिक आरोग्य, शालेय शिक्षण, पिण्याचे पाणी आणि स्वच्छता या प्रमुख पाच कारणांसाठी निधी देण्याची शिफारस करण्याचे अधिकार खासदारांना आहेत. हा निधी ‘लॅप्स’ होत नसला तरी विकासकामे मात्र रखडली आहेत. त्यामुळे तुम्ही निवडून दिलेले खासदार किती निधी खर्च करतायत याचा हा लेखाजोखा 'झी 24 तास'च्या हाती लागला आहे.
विकासनिधी खर्च न करता निवडणुका आल्या की निधी खर्च करण्यावर सपाटा लावला जातो, असा अनेक वर्षांपासून दिसून येत आहे. खासदारांना प्रत्येक वर्षात पाच कोटींचा निधी मिळतो. तो एकाच वर्षात खर्च करता येतो. त्यामुळे अनेक खासदार हे पुढील निवडणुकीच्या तोंडावर निधी खर्चण्याचा सपाटा लावतात. मध्यंतरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरदेखील हा निधी खर्च करण्याकडे कल असतो. म्हणजे विकास कामे करत असताना त्याचा निवडणुकांमध्ये फायदा कसा होईल, हे अनेक खासदार कटाक्षाने पाहतात. मात्र, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (बीड) - शून्य टक्के
- भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज (सोलापूर) - 9.10 टक्के
- भाजप खासदार संजयकाका पाटील (सांगली) - 13.67 टक्के
- भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (जालना) -16.1टक्के
- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (मावळ) 22.3 टक्के
- शिवसेना खासदार भावना गवळी (यवतमाळ-वाशिम ) 22.12 टक्के
- शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, (बुलडाणा) 23.16 टक्के
- भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर (माढा ) 26.62 टक्के
- शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (उस्मानाबाद) 27.19 टक्के
- राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील (सातारा ) 28.04 टक्के
- भाजप खासदार उन्मेष पाटील (जळगाव) 5 कोटी 4.96 कोटी 97.30 टक्के
- भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे,(लातूर) 5 कोटी 3.93 कोटी 76.73 टक्के
- भाजप खासदार मनोज कोटक (मुंबई उत्तर-पूर्व) 7 कोटी 4.77 कोटी 66.71 टक्के
- भाजप खासदार रक्षा खडसे (जळगाव) 5 कोटी 3.27 कोटी 63.51 टक्के
- शिवसेना खासदार राजेंद्र गावित (पालघर) 7 कोटी 4.37 कोटी 61.05 टक्के
- भाजप खासदार पूनम महाजन (मुंबई उत्तर-मध्य) 7 कोटी 4.14 कोटी 57.71 टक्के
- भाजप खासदार गोपाल शेट्टी (मुंबई-उत्तर) 7 कोटी 4.08 कोटी 56.85 टक्के
- भाजप खासदार रामदास तडस (वर्धा ) 7 कोटी 4.02 कोटी 56.11 टक्के
- शिवसेना खासदार संजय जाधव (परभणी) 7 कोटी 3.9 कोटी 54.45 टक्के
- एमआयएम खासदार इम्तियाज जलील (औरंगाबाद) 7 कोटी 3.81 कोटी 53.03 टक्के
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , केंद्रीय मंत्री भारती पवार, केंद्री मंत्री कपिल पाटील , राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे , राष्ट्रवादी खासदार अमोल कोल्हे , राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे , अपक्ष खासदार नवनीत राणा, भाजप खासदार सुजय विखे पाटील, शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप खासदार गिरीश बापट यांचीही विकास निधी खर्च करण्यात चांगली कामगिरी दिसून येत नाही.