मुंबई : राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.
राज्यात मंगळवारी पुन्हा एका दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा, नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होती. राज्यभरात मंगळवारी ७ हजार ७६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ इतकी झाली. राज्यात मंगळवारी ३०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
दरम्यान, राज्यभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६ हजार १४२ झाली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दरात घट होवून, तो ३ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ४२ हजार १५१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ९ लाख ४४ हजार ४४२ लोक गृह विलगीकरणात तर ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्यात आज 10309 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 468265 अशी झाली आहे. आज नवीन 6165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 305521 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 145961 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 5, 2020
बुधावारी निदान झालेले १०,३०९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३३४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११२५ (४२), ठाणे- २३२ (४), ठाणे मनपा-२८१ (९),नवी मुंबई मनपा-२९० (४), कल्याण डोंबिवली मनपा-३७१ (२३),उल्हासनगर मनपा-३० (७), भिवंडी निजामपूर मनपा-१८ (१८) , मीरा भाईंदर मनपा-१२५ (४),पालघर-११२ (२), वसई-विरार मनपा-१८७ (६), रायगड-२८३ (१९), पनवेल मनपा-१७४ (१७), नाशिक-११९(१),नाशिक मनपा-५३५ (९), मालेगाव मनपा-५१, अहमदनगर-४२४ (३), अहमदनगर मनपा-२५०, धुळे-४, धुळे मनपा-४(२), जळगाव-३२३ (३), जळगाव मनपा-१४३ (१), नंदूरबार-१० (४), पुणे- ३६४ (१५), पुणे मनपा-१२८२ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-७१४ (१४), सोलापूर-२५३ (९), सोलापूर मनपा-३८, सातारा-१९३ (३), कोल्हापूर-२६४ (१२), कोल्हापूर मनपा-१६६, सांगली-८५ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-११४ (६), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-१० (२), औरंगाबाद-१७३ (१), औरंगाबाद मनपा-१०२ (४), जालना-११(१), हिंगोली-४, परभणी-१४, परभणी मनपा-३०,लातूर-१३४(१), लातूर मनपा-१८ (२), उस्मानाबाद-१४२ (३), बीड-८९ (२) , नांदेड-१२२ (३), नांदेड मनपा-१८ (२), अकोला-२८, अकोला मनपा-४, अमरावती- २२ (१), अमरावती मनपा-२७, यवतमाळ-४६, बुलढाणा-३९, वाशिम-५७, नागपूर-१२९ (२), नागपूर मनपा-३३१ (५), वर्धा-१० (३), भंडारा- ५,गोंदिया-४६, चंद्रपूर-३८, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-३९, इतर राज्य १६ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.