मुंबई : outbreak of monkeypox virus : देशात मंकीपॉक्सचा शिरकाव (Monkeypox virus) झाल्यानंतर आता त्याचा संसर्ग महाराष्ट्रातही दिसून येत आहे. त्यामुळे पालकांची चांगलीच झोप उडाली आहे. कारण बालकांमध्ये हात-पाय-तोंडाच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बालकांमध्ये मंकीपॉक्ससारखी लक्षणं असल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.
लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण मुंबई, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात आहे. याची लक्षणं मंकीपॉक्ससारखी असल्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य संसर्ग असून या आजारामध्ये हात, पाय आणि तोंडाजवळ पुरळ येऊन मुलांना ताप येतो. यामध्ये तोंडामध्ये अल्सरदेखील होतो. पावसाळ्यात ज्याप्रमाणे विषाणूजन्य संसर्गाची बाधा होऊन ताप,सर्दी, खोकला होतो, त्याचप्रमाणं हा संसर्गदेखील पावसाळ्यात उद्भवतो. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा संसर्ग दर पावसाळ्यात मुलांमध्ये होत असल्याचे आढळले आहे.
देशात Monkeypox virusबाबत बारकाईने निरीक्षण करण्यासाठी आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्यासाठी मंकीपॉक्सवरील टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सोमवारी सांगितले. दरम्यान, भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकूण पाच रुग्ण आढळले आहेत. तर WHO ने मंकीपॉक्स ही जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य आजार असून या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, शरीरावर पुरळ येणे, खोकला आणि लिम्फ नोड्सची सूज. (body acne and swelling of lymph nodes) हा रोग स्वयं-मर्यादित आहे आणि या रोगामुळे मृत्यूचे प्रमाण 1 ते 10 टक्के आहे. या रोगाचा प्रादुर्भाव 7 ते 14 दिवसांचा असतो. हा प्राण्यापासून माणसात आणि माणसाकडून माणसात पसरतो. विषाणू संक्रमित त्वचा किंवा श्वसनमार्गास संक्रमित करतो. मंकीपॉक्स हा एक आजार आहे, जो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. जेव्हा विषाणूजन्य बॉडी फ्लुइड्सच्या संपर्कात येतो, जसे की जखमांमधून स्राव, शरीरातील द्रव इ. हा रोग पसरतो आणि तो 1 ते 2 दिवस आधीपासून एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णामध्ये पसरु शकतो.
1) हात साबणाने आणि पाण्याने धुवा.
2) आजारी रुग्णांचे कपडे, चादरी, टॉवेल, भांडी इत्यादी वापरु नयेत.
3) मांस खाताना मांस पूर्णपणे शिजवलेले असावे.
4) रुग्णांची काळजी घेताना आवश्यकतेनुसार PPE चा वापर करा. उदा. मास्क, हातमोजे इ. वापरा.
5) मृत किंवा आजारी व्यक्तीने वन्य प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये.