राज ठाकरे आज कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवली दौ-यावर आहेत. 

Updated: Oct 26, 2017, 10:43 AM IST
राज ठाकरे आज कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर title=

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवली दौ-यावर आहेत. 

आपल्या 3 दिवसांच्या दौ-यात ते इथल्या मान्यवरांशी संवाद साधण्याबरोबरच पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी-कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहेत. मुंबई महापालिकेतील मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. 

आज डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभेतील पदाधिका-यांशी चर्चा करून नंतर मनसेच्या नगरसेवकांशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत.