Raj Thackeray on Maharashtra Oath Ceremony: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं मुख्यत्वे अभिनंदन केलं आहे. 2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसंच पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर विधिमंडळाच्या बाहेर आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानात शपथविधीचा भव्य सोहळा पार पडला. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक मोठे उद्योजक, सेलिब्रिटी उपस्थित होते.
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
2019 ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.
२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस…
— Raj Thackeray (@RajThackeray) December 5, 2024
पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.
पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की...
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !