पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकले मर्सिडिज बेंझचे CEO, मग काय गाडी तिथे सोडली आणि...

पुण्यातल्या वाहतूक कोंडीचा फटका, सोशल मीडियावर सांगितला अनुभव

Updated: Sep 30, 2022, 07:29 PM IST
पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकले मर्सिडिज बेंझचे CEO, मग काय गाडी तिथे सोडली आणि...  title=

पुणे : विद्येचं, कला-संस्कृतीचं आणि स्मार्ट सिटी अशी बहुविध ओळख असलेल्या पुणे शहराची आता सर्वाधिक वाहतूक कोंडी (pune traffic) असलेलं शहर अशी नवी ओळक बनली आहे.  शहराच्या मध्यभागातील अरुंद रस्ते, खासगी वाहनांची वाढती संख्या, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि वाहनचालकांचा बेशिस्तपणा अशी अनेक कारणं यामागे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक चर्चा झाल्या, बैठका झाल्या पण अजून यावर उपाय सापडू शकलेला नाही. (Martin Schwenk stuck in pune traffic)

आता पुण्यातील या वाहतूक कोंडीचा फटका चक्क मर्सिडिज बेंझचे भारतातले सीईओंना (Mercedes-Benz India CEO) बसला आहे. मर्सिडिज बेंझचे सीईओ मार्टिंग श्वेंक (Martin Schwenk) हे त्यांच्या मर्सिडीज एस क्लास (Mercedes-Benz S class) ने पुण्यातील रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहतूक कोंडीत अडकले. काही केल्या वाहतूक पुढे सरकत नसल्यान अखेर श्वेंक यांनी आपली गाडी तिथेच सोडली. काही प्रवास त्यांनी पायीच केला आणि त्यानंतर त्यांनी थेट रिक्षाने पुढचा प्रवास केला.

श्वेंक यांनी स्वतः या बद्दल ची माहिती इंस्टाग्राम वरून दिली आहे.