विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : लग्न म्हटलं की समोर योतो तो खर्चाचा डोंगर... मात्र, प्रत्येकाची खर्च करण्याची ऐपत नसते. त्यामुळे अशा परिवारांसाठी जळगावात सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काय होती या लग्नसोहळ्याची खासीयत पाहूयात...
वाजतगाजत आलेली नवरदेवांची वरात... मंडपात जमलेली वऱ्हाडाची गर्दी आणि एकाच मंडपात लागलेले १७ जोडप्यांचे विवाह... जळगावात लागलेला हा भव्य सामुहिक विवाह सोहळा. या विवाह सोहळ्याचा थाट पहाता वधू आणि वर पक्षाला वारेमाप खर्च करावा लागला असेल असं तुम्हाला वाटेल. पण हे लग्न लागलंय अवघ्या एका रुपयात. आश्चर्य वाटेल पण हे खरंय.
एक रुपयात लग्न ही संकल्पना जळगावात राबवण्यात आली. जळगावातील मराठा उद्योजक विकास मंडळ आणि अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं.
या लग्नसोहळ्यानं आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार दिलाय. त्यामुळे या सोहळ्याचं राज्यभरात कौतूक होतंय.
राज्यातील सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दुष्काळाचा विचार करता अशा सामूहिक विवाह सोहळ्यांची गरज आहे.
जळगावात अवघ्या १ रुपयात पार पडला विवाह सोहळा