Marathi Bhasha Gaurav Din 2023 : मराठी भाषेच्या गौरवासाठी आजही राज्य आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कार्य केलं जात आहे. त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे मराठी भाषा गौरव दिना...दरवर्षी 27 फेब्रुवारी म्हणजे सोमवारी साजरा केला जातो. भारतामध्ये मराठी लोकसंख्या ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आपुलकी वाटणारी जिव्हाळ्याची आणि सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर जगाच बोलायचं झालं तर मराठी भाषा ही 10 व्या क्रमांकावर येते. विशेष म्हणजे भारतातील 22 अधिकृत भाषांमध्ये तिचा समावेश देखील आहे. तरी मराठी माणूसच मराठी सोडून हिन्दी आणि इंग्रजी बोलण्यावर भर देतात. अगदी आपल्या पाल्याला मराठी भाषेच्या शाळेत न घालता पाश्चात संस्कृती असलेल्या इंग्रजी मीडियमध्ये टाकतात. त्यामुळे राज्य सरकारकडून मराठी भाषेच्या गौरवासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. (marathi bhasha gaurav din 2023 27 February What is the difference between Marathi Raj Bhasha Day and marathi bhasha gaurav din)
प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपले लाकडे कुसुमाग्रज यांची 27 फेब्रुवारीला जयंती असते. त्यामुळे हा दिवस मराठी भाषा गौरव दिना म्हणून साजरा केला जातो. मराठीतील प्रख्यात कवी, नाटककार, कादंबरीकार अशी कुसुमाग्रज यांची ओळख...त्यांचा लिखाणाबद्दल बोलायचं झालं तर सोळा कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, अठरा नाटकं आणि सहा एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत.
मराठी भाषेला अलिकडच्या मोबाईलच्या युगातही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे सोमवारी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनसोबत मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जाणार आहे. यादिनानिमत्त राज्यभरात सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त चेंबूर महिला समाज सभागृहात मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्योती मोरे यांच्या मेघ मल्हार म्युझिकल ग्रुपकडून सोमवारी संध्याकाळी 5 वाजता मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवारी 27 फेब्रुवारीला साजरा होणार दिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' आहे. यालाच अनेक जण मराठी राजभाषा दिन असंही म्हणतात. तुम्ही पण असं म्हणत असाल तर तुम्ही चूक करत आहात. कारण मराठी राजभाषा दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने याबद्दल 10 एप्रिल 1997 रोजी परित्रकातून हा दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या होत्या. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन तर 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.
1 मे - 'मराठी राजभाषा दिन'
21 फेब्रुवारी - 'जागतिक मातृभाषा दिन'
27 फेब्रुवारी - 'मराठी भाषा गौरव दिन'