'दंगल घडवण्यासाठी...', OBC आंदोलनावरुन मनोज जरांगेचा गंभीर आरोप; 'गरज पडली तर मी...'

Manoj Jarange on OBC Reservation Protest: लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलन सुरु केलं असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गंभीर आरोप केला आहे. दंगल घडवण्यासाठी सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 21, 2024, 02:06 PM IST
'दंगल घडवण्यासाठी...', OBC आंदोलनावरुन मनोज जरांगेचा गंभीर आरोप; 'गरज पडली तर मी...' title=

Manoj Jarange on OBC Reservation Protest: लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलन सुरु केलं असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गंभीर आरोप केला आहे. दंगल घडवण्यासाठी सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळावर टीका केली. शिष्टमंडळ दोघांची फजिती करत असून, आम्हाला पाणी पाजून फसवलं असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 

"जातीयवाद मी होऊ देणार नाही. जातीयवाद आणि दंगल घडवण्यासाठीच ही आंदोलनं उभी केली जात आहेत. मी ही लढाई होऊनच देणार नाही. गाव खेड्यातील एकाही ओबीसी, मराठा बांधवावर मी हात पडू देणार नाही. वेळ पडली तर मी एखादं पाऊल मागे घेईन. पण सरकारचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. सरकारला जिंकू देणार नाही म्हणजे नाही," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, "तुम्ही सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करु नका, मग मी बघतो. तुम्ही माझ्या मराठ्यांना बुडवायला निघाला आहात ना, नाही तुम्हाला बुडवलं तर नाव बदलून ठेवेन. सगळं सरकारच बुडवून टाकेन. माझ्या जातीपुढे कोणालाच ऐकणार नाही. माझ्या जातीला मरु देणार नाही. मी जोवर जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांवर अन्याय कसा होतो पाहतो".

मराठा आंदोलक मनोज जरांगेंना हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीला न जाता थेट बीडकडे रवाना झाले आहेत. बीडच्या चाकरवाडीला एका कार्यक्रमात ते उपस्थितीत लावणार आहेत. यावेळी त्यांनी 
सरकारच्या शिष्टमंडळावरही टीका केली आहे. 

शिष्टमंडळ दोघांचीही फजिती करत आहे. आम्हाला पाणी पाजून फसवलं, आता त्यांना पाणी पाजूदेत. आम्ही केलं की जातीयवाद होतो आणि त्यांनी केलं की आंदोलन असं म्हणत जरांगेंनी ओबीसी आंदोलनावर टीका केली.