मालेगाव महापालिका गॅलरीत क्रिकेट खेळत आंदोलन, पण हे कशासाठी?

मालेगाव (Malegaon) क्रिकेट (Cricket) असोशिएशनचे पदाधिकारी आणि मालेगाव महापालिका (Malegaon Municipal Corporation) विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद यांनी चक्क पालिका गॅलरीत क्रिकेट (Cricket) खेळत आंदोलन केले.  

Updated: Dec 18, 2020, 09:38 PM IST
मालेगाव महापालिका गॅलरीत क्रिकेट खेळत आंदोलन, पण हे कशासाठी?  title=

नाशिक : मालेगाव (Malegaon) क्रिकेट (Cricket) असोशिएशनचे पदाधिकारी आणि मालेगाव महापालिका (Malegaon Municipal Corporation) विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद यांनी चक्क पालिका गॅलरीत क्रिकेट (Cricket) खेळत आंदोलन केले. मालेगाव महापालिकेच्या अजिज लल्लू क्रीडांगणाची जागा खासगी ठेकेदारांना वाहनतळासाठी देण्याचा प्रयत्नात पालिका असल्याची चर्चा आहे. 

मैदानाची जागा वाहनतळासाठी जाणार असल्यामुळे क्रिकेट खेळण्यास मैदान शिल्लक राहणार नाही. याचा विरोध म्हणून मैदान सुरक्षित राहावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोरील मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

दरम्यान जमावबंदी आदेशाचा भंग, मास्क न वापरणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, त्या बरोबरच गोंधळ घातल्या प्रकरणी किल्ला पोलिसात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.