महाविकास आघाडी सरकामधील मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाने याप्रकरणी फटकारले

Minister Dhananjay Munde was slapped by the High Court : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. 

Updated: Jun 1, 2022, 12:44 PM IST
महाविकास आघाडी सरकामधील मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाने याप्रकरणी फटकारले title=

मुंबई : Minister Dhananjay Munde was slapped by the High Court : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. मुंडे यांना शाळा बंद करण्याचा निर्णय चांगलाच महागात पडला आहे. उच्च न्यायालयाने जोरदार दणका देताना शाळा बंद निर्णयाला स्थगिती दिली आहे. तुम्ही असा कसा निर्णय देऊ शकता, असे खडे बोल न्यायालयाने मुंडे सुनावले आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांना उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावताना प्रश्न उपस्थित केले आहेत. सोलापुरातली मूकबधिरांसाठी असलेली शाळा बंद करण्याच्या मुंडेंच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. स्थगितीचे आदेश जारी करताना न्यायालयाने मुंडे यांना चांगलेच सुनावले.

शाळा बंद करण्यामागे तुमचा तर्क काय होता? मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री आहेत, हा कसला सामाजिक न्याय तुम्ही केला, असा सवाल न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी केला. सरकारने या प्रकरणात योग्य उत्तर द्यावे, असे न्यायालयाने बजावले आहे.