'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.

Updated: Jul 11, 2023, 12:26 AM IST
'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video title=
devendra fadnavis, khupte tithe gupte

Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'खुपते तिथे गुप्ते' याचं तिसरं पर्व 4 जूनपासून आता सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शविली. राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी मनमोकळ्या गप्पा मारले आहेत. त्यावेळी त्यांना खुपणारे प्रश्न विचारण्यात आले. 

अभिनेता अवधुत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी दिवेंद्र फडणवीसांना एक प्रश्न विचारला. साधे, कर्तव्यदक्ष आणि सरळ विरोधक कोणते वाटतात? केजरीवाल की उद्धव ठाकरे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दोघंही मला जिलेबीसारखे सरळ वाटतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.

कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांचा एक यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यामध्ये संजय राऊत यांनी फडणवीसांवर 500 कोटी रुपयांचा आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री भडकले. संजय राऊतांवर 1000 कोटी रुपयांचा आरोप आहे. ईडी कुठंय? असा सवाल फडणवीस करताना दिसत आहेत. मला वाटलं नव्हतं तुम्ही अशाही माणसाला उत्तर देयला सांगाल, माझा स्तर ठेवा, असं म्हणत फडणवीस काहीसे भडल्याचं दिसून आलंय. त्याचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय.

पाहा Video

दरम्यान, महाराष्ट्राचा कोणता युवानेता संयमी, अभ्यासू, दूरदर्शी वाटतो? असंही फडणवीसांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काहीसे बुचकाळ्यात पडल्याचं दिसून आलं. त्यावर प्रोमोमध्ये (Devendra Fadanvis in Kupte tithe gupte) सस्पेन्स ठेवण्यात आलाय. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस कोणाचं नाव घेणार? यावर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचला आहे.