...म्हणून चंद्रपुरमध्ये पुतण्याने चुलतीचा जीव घेतला; पोलिस तपासात धक्कादायक कारण उघड

चंद्रपुरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  पुतण्याने चुलतीची हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Updated: Jul 10, 2023, 11:59 PM IST
...म्हणून चंद्रपुरमध्ये पुतण्याने चुलतीचा जीव घेतला; पोलिस तपासात धक्कादायक कारण उघड  title=

Chandrapur Crime News : पुतण्याने पुतनीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटा चंद्रपूरमध्ये घडली आहे. चुलतीचा मृतदेह पुरुन आरोपी फरार झाला. पोलिस तपासात हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस फरार पुतण्याता शोध घेत आहेत. 

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा  तालुक्यात पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर येथे ही घटना घडली आहे. पुष्पा मधुकर ठेंगणे (वय 62 वर्षे) असे मृत महिलेचे नाव  आहे. आरोपी धिरज रविंद्र ठेंगणे (वय 20 वर्ष) हा फरार आहे. या दोघांमध्ये चुलती आणि पुतण्याचे नाते आहे.  

मृत महिलेची सून ही शेतातून दुपारी घरी परत येत असताना आरोपी हा आपल्याच गुराच्या गोठ्याजवळ काम करीत होता. यावेळी त्याने काकीच्या सुनेला म्हणजेच आपल्या वहिनीशी हुज्जत घालत तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीनेप्रतिकार करून तिथून पळकाढून घरी येऊन सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितले. 

सासू पुष्पा या जाब विचारण्यासाठी आरोपी कडे गेली असता आरोपी धिरज याने चुलतीला  दगडाने ठेचून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिला ओढत बाजूला असलेल्या शेणखताच्या गड्यात फेकून तो पसार झाला. घटनास्थळावर मुलगा गेला असता तिथे आई मृत अवस्थेत दिसली. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे शवविच्छेदन करण्यात आले.पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. 

घोरपडीमध्ये लष्करी जवानाला मारहाण करुन लुटले

लष्करातील जवानाला मारहाण करुन लुटणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परशुराम बसप्पा नगराळे (वय ३९) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्याने दोन मोबाईल संच आणि रोकड असा एकूण 17 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल लूटून नेला. पोलिसांनी सांगितले की, नगराळे हे आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये चालक आहेत. ते घोरपडीतील सोपानबाग परिसरातून सायकलवरुन निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी सुरक्षारक्षक मोहित साकेत याला अडवून मारहाण करीत धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला. नगराळे यांनी लूटमारीचा प्रकार पाहिला आणि चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी नगराळे यांना दगड फेकून मारला. त्यांना चाकूचा धाक दाखवला. नगराळे यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून घेतला. चोरट्यांनी दोन मोबाइल संच, रोकड असा 17 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. पोलीस उपनिरीक्षक शितोळे तपास करत आहेत.