Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...

नेहा चौधरी | Updated: Jun 23, 2024, 09:30 AM IST
Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट title=
maharashtra weather news update heavy rain alert vidarbha konkan and heavy rain in mumbai

Maharashtra Weather News : वरुणराजा पुन्हा एका सक्रीय झाला आहे. मान्सूने (Monsoon Update ) राज्यासह देशात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज हवामान विभागाने सांगितलाय जाणून घ्या. (maharashtra weather news update heavy rain alert vidarbha konkan and heavy rain in mumbai )

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार (rain news ) आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. मुंबई शहर (Mumbai Monsoon) आणि उपनगरात मधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस मेघगर्जनेसह बरसण्याचा अंदाज आहे. इथे आज सामान्यतः ढगाळ आकाश राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32°C आणि 26°C च्या आसपास असेल.

तर उत्तर कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

त्यासोबतच दक्षिण कोंकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.