Unique coincidence: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक विचित्र वळणं पाहायला मिळत असली तर अनेक चांगले योगायोगदेखील पाहायला मिळत आहेत. असाच एक योगायोग अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळाला. वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच विधानसभेत सोबत प्रवेश झाला. रोहित पाटील-सुहास बाबर प्रथमच आमदार बनून अधिवेशनासाठी पोहचले.
माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर (आबा) पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोघांचीही मैत्रीचे पाऊल विधिमंडळात 1990 मध्ये पडलं होतं.त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्याच सुपुत्रांकडून यावेळी पाहायला मिळाली आहे.आर आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील आणि स्वर्गीय अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर हे दोघेही एकाच वेळी नागपूरच्या विधानसभेत अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित राहिले.
विशेष म्हणजे हे दोघेही विधानसभेच्या प्रवेशद्वारावरून एकत्र सभागृहापर्यंत पोहोचले.त्यामुळे आर आर आबा आणि अनिल भाऊ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा तर मिळालाच शिवाय यानिमित्ताने योगायोग देखील पाहायला मिळाला.
आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर या दोघांचाही आर आर आबा आणि अनिल भाऊंप्रमाणे फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.1990 मध्ये स्वर्गीय आर आर आबा पाटील तासगाव मतदार संघातुन निवडून आले होते. त्याच बरोबर खानापूर मतदारसंघातून आबांचेच मित्र असणारे अनिल बाबर हे देखील आमदार म्हणून निवडून आले होते.या दोघांनीही एकत्रित आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला होता.
योगायोगाने आता आबांचे सुपुत्र रोहित आर आर पाटील आणि अनिल भाऊंचे सुपुत्र सुहास बाबर हे दोघेही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत,आणि वडिलांप्रमाणेच योगायोगाने हे दोघेही नागपूरच्या विधानसभा अधिवेशनासाठी एकत्रित दाखल झालेत.त्यामुळे वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश घडल्याचा अनोखा योगायोग घडून आलाय. आणि वडिलांप्रमाणेच मुलांनी देखील एकत्रित पहिल्यांदाच आमदार म्हणून केलेल्या विधानसभेतील प्रवेशाची चर्चा सगळीकडे सुरू आहे.