'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा

आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ

Updated: Feb 18, 2023, 11:02 AM IST
'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा title=

Maharashra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhnaushyaban Symbol) शिंदे गटाकडे (Shinde Group0 सोपवल्यानंतर ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात आता ठाकरेंशिवाय शिवसेना (Shivsena) चालणार आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. संजय राऊत दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत, इथे त्यांनी पत्रकार परिषद घेत भगवा आमच्या मनामनात कायम आहे, शाखेत घुसणाऱ्यांना ठोकून बाहेर काढू असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. 

काय म्हणाले संजय राऊत
कोकणात शिवसेना जागच्या जागी आहे. काल संध्याकाळी निकाल लागला आणि निवडणूक आयोगामधल्या पोपटरावांनी परस्पर ठरवलं शिवसेनेची मालकी कोणाला द्यायची. त्यानतंर इथं काही जणं जल्लोष करत होते, त्यात एक अब्दुल्ला नाचत होता. जे आधीच शिवसेना सोडून गेले आहेत, ते यांच्याबरोबर फटाके वाजवून नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन तुमची शिवसेना वाढणार आहे का? असा टोला नितेश राणे यांचं नाव न घेता संजय राऊत यांनी लगावला. आज सोशल मीडियावर काही कमेंट्स आल्या आहेत, त्यात एक म्हण आहे, पाळीव कुत्र्यांनी भाकरीची टोपली पळवली, म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेना ही शिवसेनाच आहे. आता सर्वच विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगला जाब विचारण्याची वेळ आली आहे, राजकीय पक्ष म्हणजे काय हे विचारण्याची वेळ आली आहे. एक पक्ष 50 वर्षांपासून उभा आहे, घटनेनुसार चालला आहे. त्या पक्षातील काही आमदार आमिषाला बळी पडून बाहेर पडले, तो पक्ष त्यांच्या मालकिचा कसा काय होऊ शकतो. हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ आली आहे असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. 

दोन दिवस आतषबाजी होईल, त्यासाठी काही खोक्यांचा बंदोबस्त झाला असेल, मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर तीन महिन्यात अडिच कोटींची जेवणाची पंगती उठतात. तर फटाक्यांवरही सरकारी तिजोरीत पाच पंचवीस कोटी खर्च केले जातील असा आरोपही त्यांनी केला.

वेदना होतील, पण खचलेलो नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, लोकं आमच्याबरोबर आहेत. पक्ष जागेवर आहे, ज्या कोणाच्या घशात हा पक्ष कोंबण्याचा प्रयत्न झाला, त्यांना लवकरच ठसका लागल्याशिवाय राहणार आहे. लोकशाहीच्या नावाने चाललेला हा राजकीय हिंसाचार आहे. आता निवडणुका घेतल्या तर शिवसेना कोणाची आहे याचा फैसला लागेल. निवडणुका घ्या त्याचा फैसला जनतेला करु द्या, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंबरोबर गेलेले सर्व आमदार, खासदार एकनिष्ठ आहेत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.