मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात गेल्या आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पण आता मात्र नागरिक अक्षरशः तापमान वाढीच्या गरमीने हैराण झाले आहे. तर झालं असं की, उत्तर भारतातील काही भागांतून मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. काही दिवसांतच महाराष्ट्रातूनही मोसमी वारे माघारी परतण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आता अनेक भागात तुरळक सरी पडल्या तरी वातावरणातील हवामान अतिशय कोरडे राहील.
हवामान्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार; महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. दरम्यान, मुंबईत मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास साधारणपणे 8ऑक्टोबरपासून सुरू होतो. त्यामुळे नवरात्रीत तुरळक प्रमाणात पाऊस पडेल. यामुळे गरबा किंवा नवरात्रीच्या उत्सवावर पावसाचं सावट राहील.
Pune Rainfall(mm) 17:30 dt. 2.10.2024, WADGAONSHERI71.0
LONAVALA22.5
KOREGAON PARK20.5
RAJGURUNAGAR19.5
DAUND16.5
MAGARAPATTA7.5
BHOR4.5
SHIVAJINAGAR2.3
INDAPUR1.5
PURANDAR1.0
PASHAN0.5
HADAPSAR0.5 pic.twitter.com/ujA5XFXFdn— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 2, 2024
मोसमी वाऱ्याच्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याचत पावसाने विशेष हजेरी लावली. अगदी कोकण, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. परतीच्या पावसाने नागरिकांना अक्षरशः झोडपलं. पण ऑक्टोबरची सुरुवात अक्षरशः उन्हाचा चटका लागून झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी 33.5 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात 32.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
Right now: Mist, Temperature: 27.99C, Humidity: 83, Wind: From W at 2.06KPH, Updated: 7:18AM #Mumbai #Weather
— WeatherMumbai (@WeatherMumbai) October 3, 2024
ऑक्टोबर महिना सुरू होताच 'ऑक्टोबर हीट'ची झळ जाणवू लागली. पारा वाढल्यामुळे गेल्या आठवड्यात पाऊस आणि या आठवड्यात गरमी असं वातावरण आहे. या आठवड्यात रात्री 27.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फक्त 6 अंशाचा फरक आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांना दिवस-रात्र गरमीला सामोरं जावं लागत आहे. आर्द्रता आणि तापमान या समीकरणामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.