महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून जुंपला वाद...

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानद्वारे ही स्पर्धा होणार आहे.

Updated: Nov 2, 2022, 04:24 PM IST
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरून जुंपला वाद...  title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या (Maharashtra Kesari Kusthi Spardha) आयोजनावरून नवीन वाद उभा राहिलाय. कुस्तीशी संबंधित राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या भारतीय कुस्ती महासंघ आणि राज्यातील संघटना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे माजी पदाधिकारी यांच्यामध्येच डावपेचांची लढत सुरू झालीय. बाळासाहेब लांडगे (Balasaheb Landge) यांना पदावरून बरखास्त करण्यात आलं असताना त्यांना कुस्ती स्पर्धा भरविण्याचा अधिकारही देण्यात आलेला नाही. मात्र बालहट्टपायी ते असं काहीतरी करताहेत की त्यावरून एक नवा वादारंभ झाला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन प्रशासकामार्फत होणार आहे. 

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संस्कृती प्रतिष्ठानद्वारे ही स्पर्धा होणार आहे. ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही त्यातून बाळासाहेब लाडंगे यांनी स्पर्धा (Competition) भरवल्यास ते आणि त्यांचा मुलगा दोघांनाच मैदानावर खेळावं लागेल, अशी माहिती समोर येते आहे. 

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेची कार्यकारिणी भारतीय कुस्ती महासंघाने बरखास्त केली आहे. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाकडून राज्यासाठी एका अस्थायी समितीची स्थापना करण्यात आली. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी पुणे राष्ट्रीय तालीम संघाकडे देण्याबाबतचा निर्णय या समितीने घेतला. पुण्याचे माजी महापौर (Mayor) मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. असं असताना भारतीय कुस्ती महासंघाने बरखास्त केलेल्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्याचा घाट घातला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याचा अधिकार आपल्यालाच असल्याचा दावा कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी केलाय. स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात त्यांनी एक बैठक देखील बोलावली होती.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

त्यावर भारतीय कुस्ती महासंघाने आक्षेप घेतला आहे. बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे सचिव नाहीत. त्यांची कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आलीय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं ते आयोजन करतायेत अशी माहिती मिळत आहे.

त्यांनी भरवलेल्या स्पर्धेत कुस्ती पटुंनी सहभागी होऊ नये अशा आशयाचं पत्रक भारतीय कुस्ती महासंघानं काढलं आहे. दुसरीकडे बाळासाहेब लांडगे हे मात्र महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.