Maharashtra Kesari Final 2023 : महाराष्ट्र केसरी फायनलमधील चीतपट करतानाचा सुवर्णक्षण, थार गाडीचा मानकरी! पाहा Video

शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चीत केलं. शिवराज राक्षेने अवघ्या काही सेकंदांमध्ये महेंद्रला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली.

Updated: Jan 14, 2023, 09:03 PM IST
Maharashtra Kesari Final 2023 : महाराष्ट्र केसरी फायनलमधील चीतपट करतानाचा सुवर्णक्षण, थार गाडीचा मानकरी! पाहा  Video  title=

Maharashtra Kesari Final 2023 : 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत शिवराज राक्षे याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चीत केलं. शिवराज राक्षेने अवघ्या काही सेकंदांमध्ये महेंद्रला आस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. महेंद्रने सेमी फायनलमध्ये सिकंदर शेखला पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली होती. (Maharashtra Kesari Final Video 2023 Shivraj Rakshe vs Mahendra Gaikwad latest marathi News) 

दुसरीकडे, शिवराज ठरवून आलेलाच की आता थांबायचं नाही त्याने एकवेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणाऱ्या हर्षवर्धन सदगीरला 8-1 ने पराभूत केलं होतं. फायनलमध्येही शिवराजने जास्त वेळ वाया न दवडत पहिल्या  मिनिटात अंदाज घेत काही क्षणात महेंद्रला आस्मान दाखवलं. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले शिवराज आणि महेंद्र दोघेही पुण्यातील तालमीत तयार होते.  वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये हे पठ्ठे तयार झाले आहेत. 

 

सेमी फायनलमध्ये दोघांची कामगिरी 
सिकंदर शेखचा महेंद्रने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. कुस्ती चालू झाल्यावर महेंद्र गायकवाडने पहिला गुण मिळवत खातं उघडलं. पहिल्या फेरीमध्ये सिकंदरकडे 1 गुणांची आघाडी होती. दुसरी फेरी होताच सिकंदर आक्रमक झालेला दिसला. मात्र उच पुरा गडी महेंद्रने बाहेरची टांग डाव टाकत 4 गुणांची कमाई केली. संपलेल्या कुस्तीमध्ये सिकंदरचा महेंद्रने पराभव केला होता. 

गादी विभागामध्ये हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात झालेल्या तुफान कुस्तीमध्ये पहिल्या पासूनच शिवराजने आक्रमण केलं. पहिल्या फेरीत शिवराजने 6 गुण मिळवले होते तर एकवेळचा महाराष्ट्र केसरी  हर्षवर्धनला एकही गुण घेता आला नव्हता. दुसऱ्या फेरीमध्ये 1 गुण सोडता शिवराजने 2  गुण घेत विजयी आघाडी घेत ती कायम ठेवत विजय साकार  केला. हर्षवर्धनने 1-8 ने शिवराज राक्षे विजय मिळवला.