HSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार

12 वी परीक्षेचा निकाल रखडण्याची शक्यता आहे कारण अजून पेपर तरासणीला सुरुवातच झालेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांनी भूमिका घेतली आहे

Updated: Mar 1, 2023, 09:31 PM IST
HSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार title=

HSC Exam Result : राज्यात 12 वी परीक्षा सुरु आहे. मात्र अजून पेपर तपासणीला सुरुवात झाली नाहीय. त्यामुळे निकाल (Results) राखडण्याची शक्यताय. कनिष्ठ प्राध्यापक (Junior Professor) संघ यांनी पेपर तापसणीवर बहिष्कार (Boycott) टाकलाय. अजून पर्यंत मॉडेल उत्तर पत्रिकेवर साधी चर्चा सुद्धा होऊ शकली नाहीय, त्यामुळे काही ठिकाणी उत्तरपत्रिका बोर्डात पडून आहे तर काही ठिकानी कॉलेजेसने (College) स्वीकारून फक्त ठेवून दिल्या आहेत. हा पेपर्सचा आकडा सध्या 50 लाखांच्या घरात आहे. मागण्या मान्य होई पर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांची भूमिका आहे. 

काय आहेत मागण्या?

2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी

सरकारी कर्मचा-यांची 10,20,30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी

निवड श्रेणीसाठी 20 टक्क्यांची अट रद्द करावी

शिक्षकांची रिक्त पदं भरावीत

वाढीव पदांना रुजू तारखेपासून मंजुरी द्यावी

अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात

विनाअनुदानितांकडून अनुदानितमधील बदलीला दिलेली स्थगिती रद्द करावी

बारावीचे निकाल कधी?
राज्यात 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. यंदा 14 लाख 75 हजार विद्यार्थी परीक्षा देतायत. परीक्षा संपली की दोन महिन्यांनी म्हणजे साधारण जून महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात लागतो. जस जसे पेपर होतात, तसे ते तपासणीला पाठवले जातात. पण आतापर्यंत ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्या विषयांच्या उत्तरपत्रिका प्राध्यापकांनी तपासणीला सुरुवातच केली नाहीए. या उत्तर पत्रिका त्या त्या महाविद्यालायत पोहोचल्या आहेत, पण त्या तपासण्यास प्राध्यापकांकडून नकार देण्यात आला आहे. काही उत्तर पत्रिका तर अजून पोस्ट ऑफिसमध्येच पडून आहेत. 

प्राध्यापकांचा लढा
कनिष्ठ प्राध्यापक गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी लढत आहेत. आपल्या मागण्यासाठी कनिष्ठ प्राध्यापकांनी अनेकदा निवेदन दिलं, आंदोलनं केली, पण अजूनही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ऐन परीक्षा काळात कनिष्ठ प्राध्यापकांना बहिष्काराचं हत्यार उगारलंय. 

हे ही वाचा : खेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा

शिक्षक आंदोलनाचा परिणाम 12वीच्या विद्यार्थ्यांच्या तपासणीवर होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे शासनानं याप्रश्नी तातडीनं तोडगा काढण्याची मागणी होतेय.. हा संप चिघळला तर विद्यार्थ्यांच्या भविष्यावर याचा परिणाम होऊ शकतो..