Maharashtra HSC 12th Result 2019 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा मुलींचा निकाल हा ९०.२५ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८२.४० टक्के आहे. यात कोकणातला निकाल सर्वाधिक म्हणजे ९३.२३ इतका लागला असून सर्वात कमी निकाल हा नागपूरचा ८२.५१ टक्के इतका लागला. तसंच यंदा गेल्यावर्षींच्या तुलनेत एकुण निकालात २.५३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. राज्याचा एकूण निकाल ८५.८८ टक्के लागला आहे. २०१८-१९ मध्ये एकूण निकाल ८८.४१ टक्के इतका होता.
परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ १५१ विद्यार्थिनींचा समावेश होता. संपूर्ण राज्यात ४४७० विद्यार्थ्यांचा निकाल ९० टक्क्याहून अधुक लागला आहे. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
लाईव्ह टीव्ही