मुंबई : आज २८ मे २०१९ रोजी दुपारी एक वाजता बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. महाविद्यालयांसह एचएससी बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर म्हणजेच mahresult.nic.in तसंच results.maharashtraeducation.com या लिंकवर दुपारी एक वाजल्यापासून हे निकाल पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे मोबाईल फोनवरदेखील एसएमएस निकाल समजणार आहेत. राज्यभरातील १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण २ हजार ९५७ केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडली. २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागाचा समावेश होतो.
- results.maharashtraeducation.com