सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

10th Result: बारावीच्या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. 

Pravin Dabholkar | Updated: May 25, 2024, 01:11 PM IST
सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या निकालाची तारीख जाहीर  title=
Maharashtra 10th Result Date

10th Result: बारावीच्या निकालानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा होती. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. सोमवार, 27 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाकडून बारावीचा निकाल 21 मे रोजी  जाहीर करण्यात आला होता.  आता दहावीचा निकाल कधी लागणार असा प्रश्न विचारला जात होता. दरम्यान दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती.

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट  mahresult.nic.in वर निकाल पाहता येणार आहे. तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या माध्यमातूनदेखील तुम्ही हा निकाल पाहू शकता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 1  मार्च ते 6 मार्च दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.