Vinod Tawde Reaction: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी विरारमधून समोर आली आहे. पैसे वाटपाचा आरोप करत विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला आहे. येथील प्रसिध्द विवांता हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला असून त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 'बविआ'चे अध्यक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंवर गंभीर आरोप केले आहेत. "राष्ट्रीय सरचिटणीसांना कायदा नियम माहिती नाही का? वाड्याला गेले तिकडून 5 कोटी रुपये घेऊन इकडे आले. त्यांच्या डायऱ्या मिळाल्यात, लॅपटॉप मिळालेत. त्यात सगळे हिशोब आहे. कोणत्या लायकीचे लोक आहेत हे? हे शिक्षणमंत्री होते आपले. यांना लाज शर्म वाटते की नाही?" असा सवाल हिंतेंद्र ठाकूर यांनी विचारला आहे. या सर्व आरोपांवर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनोद तावडे यांनी मला 25 फोन केले मला. अरे बाबा मला जाऊ द्या ना! चूक झाली, असं ते म्हणाले. यांच्या चुका माफच करत बासायच्या का?" असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला. "हवं तर माझं फोन बूक तुम्ही चेक करु शकता," असंही फोन केल्याचा दावा करताना हिंतेंद्र ठाकुर यांनी म्हटलं आहे. तसेच विनोद तावडेंनी, 'झालं ते विषय संपवा,' असं म्हटल्याचा दावा ठाकूरांनी केला आहे. 'त्यांनी लोकांसमोर येऊन लोकांना आणि पत्रकारांना उत्तरं द्यावीत, विषय संपेल. मी आता इकडे आलोय. आता बघतो," असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले.
या सर्व खळबळजनक आरोपांवर विनोद तावडे यांनी पहिल्यांदाच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे. आज नालासोपारामध्ये वाड्यावरुन परतत असताना नालासोपारा येथे मतदानाच्या आदल्या दिवशी आचारसंहितेचे काय नियम आहेत हे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. तेव्हा मी पैसे वाटतोय असा समज हितेंद्र ठाकूर यांना झाला. निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करावी.
दरम्यान या राड्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर संजय राऊतांनी यापैकी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. "भाजपचा खेळ खल्लास," असं म्हणत संजय राऊतांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या हॉटेलमधील व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओला कॅप्शन देताना संजय राऊतांनी, "जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकुरानी केले. निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो," असा टोला लगावला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बॅगा हॅलिपॅडवर तपासण्यात आल्याचा संदर्भ राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. दरम्यान, भाजपाचे हे सारे आरोप फेटाळले आहेत. विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. त्यांच्याकडे 5 कोटी रुपये आढळले. बविआच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. यावर भाजप काय खुलासा करणार? असा आरोप संजय राऊतांनी केला. निवडणूक आयोगाने आमच्याविरोधात जो चौकशीचा ससेमिरा लावला तो भाजप आणि शिंदे गटावर लावला असता तर महाराष्ट्राच्या तिजोरीत 1 हजार कोटी रुपये जमा झाले असते, असे राऊत म्हणाले. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. हा बहुजन समाजाचा चेहरा आहे. त्यांच्या हातामध्ये काही सुत्र आहेत. मोदी-शहांच्या जवळचा माणूस आहे. यासाठी भाजपमध्ये कारस्थान झालं. ज्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे, त्यांना याबद्दल माहिती असेल, असे राऊत म्हणाले.