लोकसभा निवडणूक २०१९ : यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे.

Updated: Mar 26, 2019, 11:46 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील 'रणसंग्राम' title=

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.

या निवडणुकीत यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेने भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे. भावना गवळी यांचा सामना काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्याशी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रवीण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसच्या शिवाजीराव मोघेंचा ९३,८१६ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

भावना गवळी शिवसेना ४,७७,९०५
शिवाजीराव मोघे काँग्रेस ३,८४,०८९
बळीराम राठोड बसपा ४८,९८१
राजू पाटील मनसे २६,१९४
मोहन राठोड बीबीएम २२,१६३

रणसंग्राम | यवतमाळ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप-शिवसेना मजबूत

रणसंग्राम | यवतमाळ | मतदारांच्या मनात काय?

रणसंग्राम | यवतमाळ | आवाज तरुणांचा

रणसंग्राम | यवतमाळ | 'राजाला जावई हवा'