माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार? बैठक सुरू

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातूनच निवडून आले होते, पण... 

Updated: Mar 11, 2019, 01:24 PM IST
माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार? बैठक सुरू  title=

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदार संघातून माघार घेण्याची शक्यता आहे. माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह पवारांनी व्यक्त केलाय. या संदर्भात पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये बैठक सुरू आहे. पवारांविरोधात माढ्यात नाराजी असून पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर चित्र बदलले आणि पार्थची उमेदवारी यामुळे पवार माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातूनच निवडून आले होते. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उभे न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते राज्यसभेत गेले होते. परंतु, लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर शरद पवार येत्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून उभे राहण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली होती. माढा मतदार संघातून गेल्या वेळी निवडून आलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांना यंदा थांबण्याची सूचना करण्यात आल्याचंही म्हटलं जात होतं... त्यामुळे मोहिते-पाटील समर्थक नाराज होते.

यंदाची निवडणूक भाजपविरोधातील सर्वच राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. भाजपविरोधातील महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सहभागी आहे. त्याचबरोबर पुढील पंतप्रधान कोण होणार? यावर महाआघाडीत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू होत्या.