अकोला : भारिप-बहूजन महासंघ आणि वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी सोलापुरातून लोकसभा लढविणार असल्याचं म्हटलंय. त्यामूळे सोलापुरात सुशीलकुमार शिंदे विरूद्ध प्रकाश आंबेडकर अशी हाय होल्टेज लढत रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर अकोल्यातून लढणार की नाही? या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे. आंबेडकर दोन मतदार संघातून लढणार का? असाही प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण झालाय.
सोलापुरातून आंबेडकरांची उमेदवारी आधीच वंचित बहूजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी जाहीर केली होती. आज आंबेडकरांनी त्याला दुजोरा दिला. दरम्यान, आजपर्यंत तरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे. उद्याचं सांगता येणार नाही? असं सांगत आंबेडकरांनी यावर काहीशी संदिग्धताही कायम ठेवलीय.
याअगोदर अकोल्यात बोलताना, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत जागांचा प्रश्न नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याच्या मुद्यावर बोलणी रखडल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं.