गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी गडचिरोली-चिमुर मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक नेते यांच्यासमोर काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांचं आव्हान असेल. तर वंचित बहुजन आघाडीने रमेश गजबे यांना उमेदवारी दिली आहे.
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भाजपचे अशोक नेते यांनी काँग्रेसच्या नामदेव उसंडींचा २,३६,८७० मतांनी पराभव केला होता.
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
अशोक नेते | भाजप | ५,३५,९८२ |
नामदेव उसंडी | काँग्रेस | २,९९,११२ |
रामराव ननावरे | बसपा | ६६,९०६ |
रमेशकुमार गजबे | आप | ४५,४५८ |
नोटा | २४,४८८ |