हिंगोली : राज्यात भाजप-शिवसेने आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ हा एमआयएम सोबत निवडणुकीच्या रिंगणात होता. हिंगोली मतदारसंघातून काँग्रेसनं सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. तर शिवसेनेचे हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड निवडणुकीच्या रिंगणात होते.
हिंगोलीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील विजयी झाले आहेत.
२०१४ साली हिंगोलीमधून काँग्रेसचे राजीव सातव विजयी झाले होते. राज्यात काँग्रेसने जिंकलेल्या २ जागांपैकी ही एक जागा होती. राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा १,६३२ मतांनी पराभव केला होता.