PM मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच मोठी घडामोड, BJP चा विजयी रथ रोखण्यासाठी 'या' व्यक्तीकडे जबाबदारी?

Uddhav Thackeray : सर्वात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. 2024 लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024)  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या विश्वसनिय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.  

कृष्णात पाटील | Updated: Jan 18, 2023, 01:38 PM IST
PM मोदी यांच्या मुंबई दौऱ्याआधीच मोठी घडामोड, BJP चा विजयी रथ रोखण्यासाठी 'या' व्यक्तीकडे जबाबदारी? title=
संग्रहित छाया

Uddhav Thackeray vs Narendra Modi : सर्वात मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. 2024 लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या विश्वसनिय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. (Latest Political News in Marathi)

2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती 

2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: विरोधी पक्षांसोबत बोलणी करतत आहे. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रमुख भूमिका बजावत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. खासकरुन प्रादेशिक विरोधी पक्षांची मोट बांधण्याची  जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवल्याचा दावाही करण्यात येत आहे.

महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रभावी कामगिरी केली होती. ठाकरे यांच्याकडून विरोधकांना कोणता धोकाही नसल्याने एकत्रितपणे ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आल्याचं कळते आहे.

मोदी म्हणाले, विरोधी पक्षाला कमकुवत समजू नका!

2024 च्या लोकसभा निवडणुकीला 400 दिवस शिल्लक आहेत. अतिआत्मविश्वासात राहू नका. मोदी येऊन जिंकून देतील, असा विचार करु नका. स्वत: समाजाच्या सर्व घटकांमध्ये जा आणि लोकांशी संवाद साधा. विरोधी पक्षाला कमकुवत समजण्याची चूक करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उपस्थितांना दिलाय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक सोपी नाही, हेच मोदी यांच्या सल्लानंतर दिसून येत आहे. आता महाविकास आघाडीनेही जोरदार तयारी केल्याचे वृत्त आहे. याचीच तयारी म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपविण्याचे दिसून येत आहे.

बाप पळवणारी टोळी आलेय - राऊत

बाप पळवणारी टोळी आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तेलचित्र लावत आहे, पण त्यांच्या चिरंजीवांना बोलवत नाही, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली. पंतप्रधानांची सुरक्षा ही अतिशय महत्त्वाचे आहे. युवासेनेने जर आरोप केले असतील तर त्यांनी त्या गोष्टीची शहानिशा केली असेल. असा कार्यक्रम हा दुसरा कुठल्याही ठिकाणी घेतला असता, जो सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचा राहिला असता. पंतप्रधान ज्या कामाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. एका अर्थाने आमच्याच कामावर शिक्कमोर्तब करत आहे आनंद आहे, असे राऊत म्हणाले.

हे लोक राजकारण करत आहेत. बाप पळवणारी टोळी आली आहे. शिवसेना प्रमुखांच्या तेल चित्र लावत आहे पण त्यांच्या चिरंजीव यांना बोलवत नाहीत. यापूर्वी आम्ही सावरकरांचे तेल चित्र लावलेत तेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना बोलावलं होते. फडणवीस बदला घेत आहेत की नाही माहीत नाही. महाराष्ट्रात सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरु आहे, अशी टीका राऊत यांनी केली.