जळगाव : उन्मेश पाटील यांचा विजय झाला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरुन भाजपमध्ये बरीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. भाजपने ए.टी पाटील यांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. पण स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर रद्द करण्यात आली आणि ऐनवेळी उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर तर वंचित बहुजन आघाडीच्या अंजली बाविस्कर या निवडणूक रिंगणात होते.
२०१४ च्या निवडणुकीमध्ये ए.टी पाटील यांचा ३,८३,५२५ मतांनी विजय झाला होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला होता.